डब्यांचं काय असत...

Started by shardul, August 22, 2012, 11:09:53 PM

Previous topic - Next topic

shardul


डब्यांचं काय असत.......
डब्यांचं काय असत.......
कधीही ,कुठेही, कसेही...
कुणा संगेही जायचं असत
जसं कोणी वळेल ,तसं
त्यासंगे वळायच असत
खरंच डब्यांचं काय असत...


कोणी नऊ कोणी बारा एकत्र
कोणी पंधरा कोणी बावीस एकत्र
इंजिनदादा नेईल तसं जायचं
चकार प्रश्नही न विचारता मात्र
खरंच डब्यांचं काय असत...


मिळेल ज्याला जशी संधी
त्याने रांगेत उभे राहायचे आधी
जास्तच आवाज केला कोणी
तो होतोच कारशेडचा बंदी
खरंच डब्यांचं काय असत...


न मोजता मारायचे फेर्यावर फेरे
नाका-तोंडात जरी जाती उष्ण-थंड वारे
त्यांनी तरी किती सहन करायचे
पिचकार्यांनी रंगलेली खिडक्या अन दारे
खरंच डब्यांचं काय असत...


एक दिवस मात्र त्यांचा असतो आनंदाचा
सजून नटून सुंदर जणू दिसण्याचा
रंगीत पताका लावून होते खाऊचे वाटप
असा साजरा होतो सण त्यांचा दसर्याचा
खरंच डब्यांचं काय असत...


त्यांनीही पाहिले असते साथीदाराला
रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशाला
सुखात आणि दु:खात भावूक होताना
मानसिक आधार ते हि देतात आपल्या मित्राला
खरंच डब्यांचं काय असत...


सर्व संकटात आणि दु:खात टेक ते देतात
इच्छा असो वा नसो सदैव उभेच राहतात
वर्षभर प्रवाशांची निर्लज्ज वागणूक सोडून
पुन्हा दसर्याची वाट आतुरतेने बघतात
पहा..खरंच डब्यांचं काय असत...


-- Unknown.