तू प्रेम केलंस म्हणून......

Started by atulmbhosale, August 23, 2012, 06:03:34 AM

Previous topic - Next topic

atulmbhosale

तू प्रेम केलंस म्हणून......
तू प्रेम केलंस म्हणून
चिडणार तर कुणीच नाही 
तू प्रेम केलंस म्हणून
रडणार तर कुणीच नाही

फुलवीणारा बाग़ माळी
फूलांसाठी  किती खपतों   
प्रत्येक कळी फुलावी म्हणून
पाकळी पाकळी किती जपतो

जरुर त्या माळयाकडून
मोकळ मोकळ रान घे
नकोस आसू पाहू त्याचे
विश्वासाचे दान दे

जन्मणाऱ्या प्रत्येकाने
आनंदाने जगत रहावे
फुल होण्याआधी दु:ख
कळीने का बघत रहावे

म्हनून कळे फुलून घे
अस्सल प्रेम तोलून घे
बोलता बोलता भविष्यातील 
आयुष्यावर बोलून घे


प्रेम म्हणजे विश्वासाचे
खोल खोल नाते असते
वारयावरती   झुलते फूलते
हिरवे हिरवे पाते असते

प्रेम म्हणजे अल्लंड अल्लंड 
हुंदडणारे वासरू असते
आभाळभर हसत खेळत 
भिरभिरणारे  पाखरू असते

तू प्रेम केलंस म्हणून
वसंत कसा फुलला बघ
फांदीवरुन  कोकिळ पक्षी
गाण्यामधून बोलला  बघ   

तू प्रेम केलंस म्हणून
वाऱ्यालाही  गंध आहे
पैंजनरव ऐकण्याचा पण
पाणवठयाला  छंद आहे
   
म्हणून राणी फुलून घे
अस्संल  प्रेम तोलून घे 
आपलं माणूस ओळखून खुशाल
झुल्यावरती झुलुन घे   

अस्सं प्रेम केलंस म्हणून
बुडणार तर कुणीच नाही
तू प्रेम केलंस म्हणून
रडणार तर कुणीच नाही 

तू प्रेम केलंस म्हणून
चिडणार तर कुणीच नाही ....

   अतुल भोसले (कोल्हापुर)
       8888862737
atulbhosale60@yahoo.in

Hemant Thange





VIKRANT DADA

kavitaaa chhaaaaan aahe.
  tumacha kavita sangrah aahe ka?
  asalyaas maahiti dya.


POOJA.POOJA

agadi manalaa bhavali tumachi kavitaa.
  lihit raha.....
      aamhi vaachat raahu.


प्रशांत नागरगोजे

#9
जीकलास मर्दा...लई भारी.... :)