अश्रू

Started by SATISHGAVHALE1970, August 23, 2012, 07:21:55 PM

Previous topic - Next topic

SATISHGAVHALE1970

अश्रू
डोळ्यातील आसवानी तुझ्या
पुन्हा सांगितलं मला
तुझ माझ्यावर प्रेम आहे
भिरभिरत्या नजरेने तुझ्या
चांदण्यातही शोधालेस तू मला

जाऊ नये मी
काजळाप्रमाणे
डोळ्यात लपवलेस मला
मिटले डोळे जरी
मिठीत लपवलेस तू मला

ओंजळीत पाणी रहात नाही
विरहाने माझ्या
रात्र रात्र जागवून
अश्रूंमध्ये प्रिये
डोळ्यात साठवलेस तू मला -  सतीश लक्ष्मण गव्हाळे