दंगल

Started by विक्रांत, August 30, 2012, 01:45:42 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

मैदानाचे झाले रण
क्षणात जाळले नंदनवन
बेसावध रक्षक गण
द्रोहा आले उधान

झाली किती वर्ष तरीही
देश अजुनी विछिन्न
बाहेर एक पाकिस्तान
असे आत एक आन

अजून द्वेष मनामनात
अजून दाटले कडवटपण
वरवर पुष्प आच्छादन
आत जहरी कृपाण

रटरटणारी भिती आत
वर सौहार्दाचे झाकण
जरा हलता हलविता
ये हिंसा वर उसळून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.


केदार मेहेंदळे


विक्रांत