चिऊताई चिऊताई

Started by केदार मेहेंदळे, August 30, 2012, 03:59:48 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

चिऊताई चिऊताई
चोच तुझी इवलीशी
दिवसभर करून चिवचिव
दुखत नाही कशी?

चिऊताई चिऊताई
रोज उठता लौकर
झाडावर बसून सकाळी
घालता कसला गोंधळ?

चिऊताई चिऊताई
कसली तुला घाई
काच असते बंद
तुला दिसत कसे नाही?

चिऊताई चिऊताई
बसा शांत बाई
वाटीत ठेवलंय पाणी
ते पीत का नाही?

चिऊताई चिऊताई
सांग तरी जराशी
पोळी घेऊन जातेस ती
खातेस तरी कशाशी?

चिऊताई चिऊताई
घरात येतेस बिंधास
घर मात्र बांधतेस का
फोटो मागे आडोशास?

चिऊताई चिऊताई
शाळा भरते काऊची
चिवचिव तुमची दिवसभर
आभ्यास करता कधी?

चिऊताई चिऊताई
खोड्या तुझ्या किती
आभ्यास नाही केला तर
होशील  कशी मोठी?

केदार...

atulmbhosale

केदार,  बाल कविता खूप छान आहे . मला फार आवडली.
फक्त शेवटच्या चरणात थोडासा बदल   कदाचित तो तुमच्याकडून राहून गेला असेल.
चिऊताई चिऊताई
खोड्या तुझ्या किती
आभ्यास नाही केला तर
होशील मोठी कशी मोठी ?

अतुल भोसले

atulmbhosale

sorry .

  केदार,  बाल कविता खूप छान आहे . मला फार आवडली.
फक्त शेवटच्या चरणात थोडासा बदल   कदाचित तो तुमच्याकडून राहून गेला असेल.
चिऊताई चिऊताई
खोड्या तुझ्या किती
आभ्यास नाही केला तर
होशील  कशी मोठी ?

अतुल भोसले

केदार मेहेंदळे

Dear Atul,

Reply ani suchavlelya sudharne baddal dhanyvad. Pan mala samajal naahi. Mhnje shevatchi ol होशील  कशी मोठी ? ashi havi aahe ka?

SAMIKSHAN

KAVITA  SUNDAR AAHE .

चिऊताई चिऊताई
शाळा भरते काऊची
चिवचिव तुमची दिवसभर
आभ्यास करता कधी?

चिऊताई चिऊताई
खोड्या तुझ्या किती
आभ्यास नाही केला तर
होशील मोठी कशी?


     FAKT YAA DON KADVYAAT  DUSARYA AANI CHOUTHYA OLIT YAMAK BAGHAAVE .. KADACHIT VAACHAK ATUL NE YAA SATHICH BADAL SUCHAVALA ASEL..
     SUCHANA SWAGATARH  PAN BADAL KARAYACHA KI NAAHI HE  DEPEND ON KAVI...

      KEDAR
         LIHIT RAHAVE....  CHAAN SHABD RACHANA...

केदार मेहेंदळे

tumchyaa sudharna yogya aahet. pan malaa ajun yogy yamak suchat nahiye

atulmbhosale

केदार ,
यमक साधून परिणामकारक अर्थबोध होत नसेल तर त्या ठिकाणी यमक बाह्य शब्द बिनधास्त वापरा. हे नवकाव्याचे वैशिष्ट्य आहे. पण मला कविता वाचन करताना जाणवले कि त्या कडव्यात कवितेची पकड कुठेतरी ढिली होत जाते. जी कि प्रथमपासून आहे. शब्दांची अदलाबदल करून अर्थात बदल होत नाही म्हणूनच  हा बदल सुचविण्याचे मी धाडस केले.
हे वाचून पहा -                                               
चिऊताई चिऊताई
खोड्या तुझ्या किती
आभ्यास नाही केला तर
होशील मोठी कशी?

आणि हे पण वाचून पहा-
चिऊताई चिऊताई
खोड्या तुझ्या किती
आभ्यास नाही केला तर
होशील  कशी मोठी ?

थोडा फार बदल जाणवतो का पहा. नाही जाणवल्यास मला माफ करा. स्व निर्मिती वर  कवीचा पूर्ण हक्क असतो. त्यात वापरलेल्या शब्दांवरही. तुम्हाला कांही सूचना देन्याइतपत मी मोठा नाही याची मला पूर्णत: जाणीव आहे.
    माझ्या प्रतिसादास तुम्ही प्रतिसाद दिलात या बद्दल धन्यवाद तरी कसे म्हणू?

केदार मेहेंदळे

Dear Atul,

I have changed as suggested by you.

thankx

shashaank

vaa kedaar, mastach jamaleeye agadee....
keep it up....