एक परी

Started by प्रशांत नागरगोजे, September 02, 2012, 11:12:28 AM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे




तिथे बसलेलो असायचो मी...तासंतास...सुर्याच संध्येशी मिलन होईपर्यंत...तिची वाट पाहत. मनात फक्त एकच इच्छा असायची...तिने अलगद पावलांनी यावं...नजरेला नजर भिडावी....अन् तिने एक मंद स्मित दयावं.तिच्या एका भेटीसाठी देवाला वारंवार विनवण्या करायचो...डोळे मिटवून तिचा चेहरा पाहत राहायचो...तिच्या भेटीच्या आतापर्यंतच्या आठवणी हृदयाच्या पाटीवर गिरवत राहायचो...अन् नकळत ती यायची...मंद मंद पावलांनी...नजर झुकलेली...गालावर स्मित सजवून...एक परी. त्या परीच्या वाटेवरील धूळ सारण्यासाठी मंद वारा धावून जायचा...वाऱ्याच्या तालावर तिचे केस नृत्य करायचे...ते तीचं रूप...ते सौंदर्य...मी पाहत रहायचो...डोळ्याची पापणीदेखील ना लवता...अन् तो क्षण मनात कैद करून ठेवायचो...नेहमीसाठी.

या भेटीला तिला मनातलं सांगायचं या निश्चयानं मी तिथे बसायचो...हळूहळू ती जवळ यायची...पावले अजून मंद व्हायची...इकडे मी...काय बोलायचं ते विसरायचो...मनातली धडधड वाढायची... आता बोलतो,आता बोलतो म्हणता म्हणता शब्द ओठांवरच राहायचे.... तरी पापणी न लावता...मी तिला पाहत रहायचो.

मंद वाऱ्याच्या तालावर नृत्य करणारी तिची ओढणी अलगद डोळ्यांना स्पर्श करून जायची...तेव्हाच कधी न लावणारी पापणी लावायची...माझ्यापासून काही अंतरावर जाऊन ती उभी राहायची...कदाचित आजतरी मी बोलेल...याची वाट पाहत...तरी मी अबोल रहायचो...
मनाला कधी धीर झाला नाही...जे बोलायचं होतं त्या शब्दांनी ओठांची कधी साथ सोडली नाही...आणि आज माझं हृदय तिच्या आठवणींची साथ सोडेना गेलंय...आज पुन्हा मी देवाला विनवण्या करतोय...तिची एकदा भेट घडूदे...यावेळेस तिला सांगणार...मनातलं सगळं... 

पण आज ती माझ्यापासून दूर आहे...तिच्या आठवणी मी हृदयावर परत परत गिरवतोय...पुन्हा पुन्हा तिच्या सहवासातले क्षण जगतोय...कारण अजून आशा आहे...एकदिवस ती येईल...तेव्हा सांगेल तिला सर्वकाही...मनातलं सगळं...तिही सांगेल...गुपित...तिच्या मनातलं....

                                                                                                                                     -आशापुत्र
माझी फोटोग्राफी @ www.prashu-mypoems.blogspot.com
                                                                                                                              -