गणपतीची खंडणी

Started by विक्रांत, September 06, 2012, 08:41:31 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

मंत्र सारे ऋचा साऱ्या

प्रार्थना व्यर्थ आहे

देणगीतील खंडणीचा अर्थ

मात्र सार्थ आहे



साऱ्यांचे हिशोब त्यांच्या

दफ्तरी दर्ज आहे

माफीसाठी केलेले अर्ज

सर्व खारीज आहे



घेवून फुले आरत्या

देव मंडपात गप्प आहे

ताटातील चील्लरीवरी

आणि कुणाचा हक्क आहे



खर्चाचा हिशोब त्यांना

कोण  विचारणार आहे

जातील पिढया उद्धरून

ऐसे पुण्य द्वाड आहे



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.

केदार मेहेंदळे

सांगायला लागतं आता मंदिरात रहातो देव आहे पाप पुण्याचे आता नियम त्याचे हि बदलले आहे    त्यालाही हवीशी वाटतेय  छान जागा रहायला दाग दागिन्यांनी माढून सुवर्ण मूर्ती बनायला   भाविकांना तरी आता जुनी देवळ कुठे आवडतात देवा पेक्षा आता त्याच्या दागिन्याचे महत्म्य सांगतात