रंग गेला गंध गेला...

Started by Sadhanaa, September 09, 2012, 01:14:32 PM

Previous topic - Next topic

Sadhanaa



रंग गेला गंध गेला...

रंग गेला गंध गेला  सूर-संगीतही संपले
आठवणींच्या रूपाने  बोल फक्त मागे उरले ।
राहिले सहचर्य आपुले विरहाच्या त्या दुःखांत
दूर दूर राहून आपण  मांडे खातो फक्त मनात ।
बोलाचा भात बोलाची कढी  ऊत त्यासि कसा येईल
संसारास अशा आपल्या रंग सांग कसा चढेल ।
आज राहिल्या स्मृति  अन  जीणे जगविणेच राहिले
विसरले प्रेम आणि दूरचे सहचर्य राहिले ।।

                                                       रविंद्र बेंद्रे
[/size][/font][/color]
चित्र-कविता आपल्याला येथे बघता येईल ...
http://ravindrabendre.blogspot.com/2012/08/blog-post_24.html

Tejas khachane

रंग गेला गंध गेला तरी
मनी नाद तुझाच राहिला
आठवणीत तुझ्या भान हि विसरून गेलो
तरी प्रीत तुझी न विसरलो
सोडून सारे जग प्रेम केले फक्त तुला
आणि क्षणार्धातच तू विसृरून गेली मला




तेजस