जसं कृष्णाच प्रेम होत राधेवर

Started by SANJAY M NIKUMBH, September 14, 2012, 08:24:13 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

एका मनाचं मनावर
एका हृदयाचं हृदयावर
तुझं न माझं प्रेम 
भेटलं आड वळणावर
कुणीच कुणाला पटवलं नाही
कुणीच कुणाला गुंतवल नाही
कुणालाही असं वाटलं नाही
कुणी भेटेन प्रेम करणारं
न वेळ बरोबर होती
न काळ बरोबर होता
मनातही आलं नाही
कुणी भेटेल जीव लावणारं
कधी श्वास दोघांचा
एकच होऊन गेला
कधी भाळली मन 
एकमेकांच्या गंधावर
माझ्या आत्म्याला तुझ्यात
काहीतरी वेगळं दिसलं 
त्याच मन गुंतलं
प्रिये तुझ्या आत्म्यावर
कसलीही लालसा नाही 
कुठलीही वासना नाही 
कळतही नाही तरी का
प्रेम करतो एकमेकांवर 
या जगातलं हे
एकमेव प्रेम असेल
ज्यात दोन जीव जगतात
एकमेकांच्या विश्वासावर
हे प्रेम प्रिये
आहे युगायुगांच
जसं कृष्णाच होत   
जन्मोजन्मी राधेवर.