भावना शब्दांत गुंफतो ...

Started by Sadhanaa, September 15, 2012, 11:03:29 PM

Previous topic - Next topic

Sadhanaa



काय तुला कसे कळावे  सरतो कसा एकेक दिन
आठवणींच्या पुस्तकाचे  उघडे असते पान न पान ।
धूंद काळोखी रात्र ती  सताविते मज क्षणोक्षणी
स्वप्न मी पहात असतो  अंधरातून उघड्या नयनी ।
काळोखाच्या पडद्या आड  लपलेल्या त्या भावनां
तसेच शिरशिरुनी अंग  उफाळणार्या सुप्त कामना ।
संगम होऊनि दोघींचा   मन माझे विचल होते
परि एकला असे म्हणुनि  तेंच पुन्हां विकल होते ।
परंतु तुजला नाहीं जाणीव  विकल ह्या मनाची
दूर जाऊनि म्हणून पाहसी  तळमळ होते मम हृदयाची ।
वाटला नच का गंध तुला  जाणुन घेण्या माझे मन
तसेंच साहील कसा हा  विरहांतील हें रात्रं दिन ।
तुला नसे रसगंध परि मज-मन मात्र आतुरतेने
भेटसी तूं नच म्हणोनि  तुला सारखे स्वप्नांत पाहते ।
हाच चाळा वेड्या मनीचा दिवसन् रात्र चालूं आहे
मम मनांत बसते प्रीती  म्हणुन भावना शब्दांत गुंफतो  ।।
                                                                         
रविंद्र बेंन्द्रे


             भावना शब्दांत गुंफतो ...
http://ravindrabendre.blogspot.com/2012/09/blog-post_15.html

Tejas khachane


sappubhai