रविवार ..

Started by Rohit Dhage, September 17, 2012, 12:05:39 AM

Previous topic - Next topic

Rohit Dhage



दुपारी chill मारत असताना फोन वाजला. आपल्याला ढोलपथकाचा कार्यक्रम बघायला जायचंय. माझे डोळे आधीच जड झालेले. डोळ्यांवर थोडी झोप होती. त्यानं असं विचारल्यानंतर माझ्या कानात आपसूक ढोल पथक वाजू लागलं. ढाण ढाण करत माझ्या झोपेचे चिंधडे उडणार असं दिसू लागलं. पण तरी आपण असं कुठं कधी पाहायला जात नाही. वरून रविवार!  मन मारून का होईना पण जावं असं मनात येऊन गेलं. अर्ध्या तासांनी निघालो पण. तिथे पोचतो तर तिकीट आधीच संपलेले. मग काय करावं तर पब पासून सारसबागपर्यंत चर्चा झाली.. ती खडकवासल्यापाशी येऊन थांबली. तिथे गाड्या लावून समोर पाहतो तर बासच..!!  का कुणास ठावूक, पण माझा मूड आणि समोरचं दृश्य यांच्यात कुठेतरी साम्य होतं. इतर वेळी कदाचित मला ते एवढं आवडला नसतं. पण आत्ता ते स्वर्गाहूनही सुंदर भासत होतं. लांबच लांब पाणी. त्यावर चकाकणारा सूर्य पारा जणू. पल्याड डोंगर कडे. त्यावेळी खूप स्पर्शून गेलं मनाला. पाण्यात उतरण्याचा मोह अजिबात आवरता आला नाही. छोट्याश्या उसळणाऱ्या लाटा अंगावर घेत किनाऱ्यावर दगडांवर कितीतरी वेळ बसून होतो तसाच. वाटलं.. काही मनातलं सांगायचं असेल कधी.. मन मोकळं करायचं असेल कधी.. एखादी छानसी सोबत असेल कधी.., तर ह्या ठिकाणाला पर्याय नाही..! हे एकच ठिकाण असं वाटलं जिथं अजूनही लोणावळ्याची वा सिंहगडाची गर्दी झालेली नाही. मग कणीस आलं. गरमागरम भजी.. चहा.. वा..!! एवढा भारी आणि सुंदर रविवार कधी असतो का.. अजून काय हवं एका रविवार कडून. मन भरून घेतलं ह्या रविवारी मी.

- रोहित


Vaishali Sakat