ती कां आवडते

Started by SANJAY M NIKUMBH, September 17, 2012, 08:29:19 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

ती कां आवडते
मी मनास विचारतो
तिला हृदय का दिलं
मी हृदयास विचारतो
तेव्हा मन न हृदय
माझ्यावर तुटून पडतात
तुझं डोकं ठिकाणावर
नाही मला सांगतात
तिच्यासारख कुणी तुला
भेटलं होत का रे
इतका जीव कुणी तुला
लावला होता का रे
इतका विश्वास तुझ्यावर
कुणी टाकला होता का रे
इतकं चांगल तुझ्याशी
कुणी वागलं होत का रे
या प्रश्नाचं उत्तर
माझ्याकडे नव्हत
कुठून मी विचारलं
असं झालं होत
मी म्हटलं बाबांनो
मला माफ करा 
विसरून जा मला
पण तिच्यावर प्रेम करा .  संजय एम  निकुंभ , सागरशेत ,वसई