दिनचर्या

Started by Sameer Nikam, September 21, 2012, 02:50:14 PM

Previous topic - Next topic

Sameer Nikam

पहाट होताच पसरते सोनेरी किरणाची लाट
मग सुरु होतो साऱ्या पक्षांचा किलबिलाट
 
सजते सारे रान दवबिंदूच्या मोत्यात
नाही थांबले आता कोणी घरट्यात
 
दुपारच्या मध्यावर भाजे अंग उष्णवारा
मिळे आश्रय गारवा झाडांच्या छायेत सारा
 
मंदावला सायंकाळी सूर्याच्या तेजाचा थाट
आता शोधे पक्षी आपल्या परतीची वाट
 
सुरु होतो खेळ काजवांच्या लुकाचीपिचा
वाटे आवाज मधुर किरकिऱ्या रातकीड्याचा
 
पसरले चारही दिशा आता काळोखाचे साम्राज्य
उरले फक्त आता घनगोर शांततेचे राज्य

कृपया कविता वाचल्यावर आपल्या प्रतिकिया द्याव्या कारण मी या क्षेत्रात नवीन आहे धन्यवाद
समीर स निकम

केदार मेहेंदळे


atulmbhosale