होतास तू एकटाच जगीं ...

Started by Sadhanaa, September 22, 2012, 02:52:34 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

.
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .. Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/09/blog-post_21.html
      होतास तू एकटाच जगीं...

होतास तू एकटाच जगीं
एकलाच रहाणार आहेस
जीवनाला स्थैर्य नाहीं .....म्हणून वणवण फिरणार आहेस ।
तूं एक फूल आहेस
जें कधीं उमलले नाही
तूं अशी ज्योत आहेस
जी कधी पेटली नाहीं
चहुकडे प्रकाश असूनही ..... तूं अंधारात रहाणार आहेस ।
तूं एक रात्र आहेस
जी कधी संपणार नाहीं
अशी एक मदिरा आहेस
जी धुंद करणार नाहीं
रंग असून जीवनाला.....तूं बेरंग रहाणार आहेस । 
खळाळणारी सरिता तूं
परि त्यांत जीवन नाहीं
अथांग दर्या असून तूं
तुला कुठे किनारा नाहीं
गंगा जवळ असून ही.....तूं तहानेला रहाणार आहेस । ।   

रविंद्र बेंद्रे



केदार मेहेंदळे