"मला जाणू दे"

Started by yuvrajpatil001, September 22, 2012, 02:01:55 PM

Previous topic - Next topic

yuvrajpatil001

का गरज पडते तुला डोळ्यामध्ये काजळ भरण्याची
नकळत माझ्याकडे पाहून पापण्या लवण्याची

कळत मला..तू माझ्याकडे पाहतेस
तुझी हीच तर नजर..मला घायाळ करते

जवळून जाताना तुझी नजर खालीच असते
दूर गेल्यावर का वळून पाहतेस..??

तुझा विचार मनाला खूप आनंद देतो
होत-नव्हत माझ..सार लुटून नेतो

न जाणे..मनात कुठल काहूर दाटलय
सांग ना..तुझ्या मनात कुठल गुपित लपलंय

तुझ्या वागण्यातल गूढ मला कळू दे
प्रेम आहे कि Just Timepass मला जाणू दे..""


Yuvraj Patil...""

केदार मेहेंदळे