तू समोर असलास की

Started by SANJAY M NIKUMBH, September 23, 2012, 06:46:40 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तू समोर असलास की
माझं भान हरवत
कळत नाही कसं
माझं मन थरथरत
नकळत मनात एक
वीज चमकून जाते
तुझी तीष्ण नजर
माझं काळीज जाळून टाकते
तुझ्या डोळ्यातलं प्रेम पाहून
मी बेभान होऊन जाते
नकळत माझ्या हातनं
मन निसटायला लागते
वाटत त्या क्षणी
नको ते घडून जाईल
तुझी माझी प्रीत
या जगास कळून जाईल
तोल जाईल तुझा
असं माझं मन ओळखत
म्हणून तू जा आता
माझं मन तुला सांगत
तू जातांना कळतात रे
तुझ्या मनातील भावना
मी हि जळते तुझ्या स्पर्शासाठी
काय करू सांग ना !                   दि.२३.९.१२ वेळ : स.६.२५               
                                    संजय एम निकुंभ, सागरशेत,वसई