MK मध्ये एक सार्वजनिक wall FB सारखा

Started by हर्षद कुंभार, September 23, 2012, 12:05:12 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

नमस्कार MK ,
                     एक MK साठी नवीन कल्पना घेऊन आलो आहे. MK मध्ये एक  सार्वजनिक wall FB सारखा असावा जिथे. सगळेजन आपले मत व्यक्त करू शकतात. प्रत्येक वेळेस कविते संदर्भात लिहावे असे काही नसते ना. हान पण या wall वर फक्त मत असावीत. इथे कविता पोस्त करू नये असे ठेवावे.  गेस्ट user आपले मत त्या Wall वर दिरेच्त टाकू शकतात ना. MK बद्दलच्या प्रतिक्रिया असतील. कवी ला नेहमीच कविता सुचतात असे नाही ना मग त्याच्या मनातले सध्याचे विचार कुठे मांडेल तर त्यासाठी हे Wall असावे.     आता हेच बघा ना मला हे मनातले सांगायचे आहे की 


"आयुष्य बहुतेक माझ्यावर रुसले आहे. गेले काही दिवस ते माझ्याशी बोलत नाही की हसत नाही.
काय सांगू आयुष्याला आता ऑफिसच्या कामात इतका मी अडकलोय.
आयुष्य जगायला वेळ कुठे राहिलंय आता. घड्याळातले काटे तेव्हडे दिवस संपल्याचे इशारे देतात. दमलेले शरीर फक्त आराम मागते.
थकलेल्या मनाने काही लिहायले घेतले की मोत्यांची माळ तुटून सगळे मोती गळून पडावे अगदी तसेच शब्दांचे होते.
आयुष्य कुठे मागे राहिले आणि मी आलोय पुढे एकटाच त्या आयुष्यात सार ठेवून आलोय जसे.
स्वतःपासून दूर जाण काय असते ते कळतंय मला.
अर्थात अशी वेळ पहिल्यांदाच आलेय असे नाही या आधीही असे झाले आहे त्यातून बाहेर येऊन पुन्हा जोमाने लिहिणे होईलच
त्यामुळे चिंता नसावी. तद्वत मला रजा द्या. - हर्षद कुंभार "

तर हे मी कुठे पोस्ट करावे. - हर्षद कुंभार

santoshi.world

hyasathi "General Discussion" section ahe ki MK var :) .. tu tya section madhye post karu shakatos tuzya manatale kavite vyatirikt etar kahi asel tar ...