‎"माझ साहित्य"

Started by yuvrajpatil001, September 23, 2012, 06:51:32 PM

Previous topic - Next topic

yuvrajpatil001

काहीतरी मोठ करण्याची सुरवात छोट्यापासून झाली..,
तोच अभिप्राय..;
Dude ..तू चक्क आमची कॉपी केली...

पुन्हा जर छापील धंदे केले तर
तुला शब्दांनीच ठेचू..,
कुणास ठाऊक..
कुणी सोडला टीकेचा विंचू...

शब्दांचा सहारा घेतोय..,
अन स्वताला सावरतोय..
हळू हळू का होईना..,
पण..वणवा पेट घेतोय...

आयुष्याचे क्षण होते नशिबाने मंतरलेले..,
जे परिस्थितीने शिकविले नी भोगविले
तेच शब्दात उतरविले...

न जाणतो मी..आहात तुम्ही कोण..??
असेल मजसाठी नेहमी ते गौण..,
एकदिवस नक्कीच बदलाल आपला पाहण्याचा दृष्टीकोन...

मी न तत्वज्ञानी..न कुठचा साहित्य आरेखक..,
न समजतो स्वताला कुणी दिग्गज लेखक...
न वाटते तुम्ही बांधावे मरणोत्तर स्मारक...

नको मज कीर्ती..न तुमचे आदरतिथ्य..,
फक्त एकदाच म्हणा.."हेच खरे मराठी साहित्य"


आपला युवराज...""