तुला एकदा विचारलं होत...

Started by yuvrajpatil001, September 23, 2012, 07:02:44 PM

Previous topic - Next topic

yuvrajpatil001

तुला एकदा विचारलं होत...

तू माझ्यावर प्रेम करतेस का...??
जसा मी मरतो तुझ्यावर
तूदेखील मरतेस का...??

तुला एकदा विचारलं होत...

तू माझ्यासाठी कधी झुरतेस का...??
जसा मी नेहमी तुझी काळजी करतो...
तूदेखील करतेस का...??

तुला एकदा विचारलं होत...

आकाशातील तारे तुटताना काही मागतेस का...??
मी नेहमी तुझ्यासाठीच मागतो...
तु पण फक्त माझ्यासाठीच मागतेस का...??

तुला एकदा विचारलं होत...

मित्रांच्या गर्दीत असूनसुद्धा माझ्या विचारात हरवतेस का...??
मी जसा तुझी वाट धरून चाल्लोय...
तूदेखील चालतेस का...??

तुला एकदा विचारलं होत...

साथ माझी देशील का...??
जशी फुलाला पाकळी...
तशी माझी बनून राहशील का...??

तुला एकदा विचारलं होत...

अशीच गट्ट मिठीत राहशील का...??
मी जसा तुझ्या हृदयाच्या स्पंदनात माझ नाव ऐकतो..
तूदेखील तुझ नाव ऐकतेस का...??

तुला एकदा विचारलं होत...

सोडून जातेय मला..अरे पण का...??
तुझ्यावरच प्रेम असेल पाहिलं नी शेवटच
कारण..,माहितीये मला..;

येशील वेडे पुन्हा माझ्याकडेच...नाही का...!!! ♥ ♥ ♥


Yuvraj Patil...""