तुला पहिले कि

Started by Sameer Nikam, September 25, 2012, 02:55:10 PM

Previous topic - Next topic

Sameer Nikam

तुला पहिले कि होई मन वेडेपिसे
असून गर्दीतही स्वतःला विसरे कसे

तुझ्या गालावरच्या खळीत मन बुडून जात
मन उधान वाऱ्याचे का होऊन उडू लागत

मन बावरे होई तुझी ओठांची मोहर खुलताच
होई मी अबोल का तुला पाहताच

तुझे स्मित हास्य करी घायाळ हे मन
वाटे राहावे तसेच थांबून का तो क्षण

तुझ्या केसांच्या जाळ्यात मन गुंतून जात
वाटे आपले आहे का जन्मा जन्माचं नात

समीर स निकम