कळले तुझे प्रेम

Started by SANJAY M NIKUMBH, September 26, 2012, 07:54:48 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

कळले तुझे प्रेम

मी का प्रेम करतो तुझ्यावर
सारे काही तुला मी सांगितले
मी किती प्रेम करतो तुझ्यावर
सारे पुरावे मी तुला दिले
मी तूला म्हणालो
वाचलीस का तू माझ्या भावनांची शब्दफुले
तू म्हणालीस मला
अजून तर मी ते पाकीटही नाही उघडले
मी भावनाशील असल्यान
माझ्या डोळ्यात अश्रू तरळले
तर तू म्हणालीस
मला ठाऊक आहे तुझे मन कसे गुंतले
माझ्यावर जीवापाड तू किती प्रेम केले
माझ्यावरच्या प्रेमानेच तर तुला शब्द सारे सुचवले
तू लिहित असतांना तुझ्या डोळ्यानीच मी वाचले
तुझं प्रेम पाहून माझं मन गहिवरून आले
तुझ्या मनातले प्रेम प्रिये आज मला कळले .
                                                           संजय एम निकुंभ ,वसई
                                                          दि. २६.९.१२ संध्या.७.३०   

प्रेमकवी

दिल तुम्हे
दिया है-tu

मनात तु,

दवात तु,

फुलात तु,


माझ्या ह्रदयाच्या
हर एक स्पंदनात
...........tu.