आभाळमाया

Started by SANJAY M NIKUMBH, September 27, 2012, 06:55:32 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

आभाळमाया 

आईच असते अशी
तिला कुणीही गृहीत धरतं
कारण मुलांना माहित असतं
तिचं मन माफ करत 
ती जन्म देते, ती घडवते
पोटाला चिमटा काढून मुलांना भरवते
तळहाताच्या फोडासारख त्यांना जपते
स्वतःच अस्तित्वही ती विसरून जाते
कितीही मोठा अपराध
तीच पोटात घालू शकते
कारण जन्म देतांनाची कळ
तिनच सोसलेली असते
पिल्लांशिवाय कुठलाही विचार
तिच्या मनात नसतो
कुठेही असली तरी पिल्लांसाठी
जीव टांगणीला लागलेला असतो
बऱ्याच मुलांना तिची
माया कळत नसते
त्यांच्यासाठी ती हक्काची
बँक न मोलकरीण असते
कितीही मोठी झाली पाखरं
तिचं लक्ष त्यांच्यापाशीच असते
तिला दु:ख जरी दिल
एका क्षणात विसरत असते
प्रत्येक आईसाठी तिचं मुलं
एक काळीजच असतं
आईशिवाय या जगात
अनमोल काहीच नसतं
ते एकच नात आहे
जे पुन्हा भेटू शकत नाही
ती असते आभाळमाया
तिच्याइतक प्रेम कुणी करू शकत नाही .
                                                   संजय एम निकुंभ , वसई
                                                  दि. २६.९.१२ स.  ७.४५ वा.

bahubali

 ज्‍यांना आई नसते त्‍यांनाच खरी माया काय असते याची जाणीव असते. :'(