असे वाटते आजकाल,कोणासाठी जगू नये

Started by Mandar Bapat, September 28, 2012, 10:42:20 AM

Previous topic - Next topic

Mandar Bapat

असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये
आपण असतो आपले कोणी आपला म्हणू नये
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये

कळीचे होते गुलाब ,गुलाब कोणी मागू नये
ठेवा आठवणीच्या पाकळ्या,काटे कोणी टोचू नये
असे वाटते आजकाल ,कोणासाठी जगू नये

कल्पनेचा खेळ सारा,काव्य कोणी मागू नये
गोंदा मनी अक्षरे सारे,कागद कोणी फाडू नये
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये

जन्म-मृत्यूचा हा खेळ,जन्म कोणी मागू नये
जिंकून घ्या विश्व सारे,जीवनरेषा कोणी खोडू नये
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये

मी तिचा ती माझी,तीचासाठी कोणी जगू नये
वेगळे तिचे जग सारे,प्रेमामध्ये कोणी पडू नये
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये
   
आपण असतो आपले, कोणी आपला म्हणू नये
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये

                                                  ----- मंदार बापट

केदार मेहेंदळे





Tushar Kher

जन्म-मृत्यूचा हा खेळ,जन्म कोणी मागू नये
जिंकून घ्या विश्व सारे,जीवनरेषा कोणी खोडू नये

अप्रतिम विचार !

खूब छान कविता


jyoti salunkhe

जन्म-मृत्यूचा हा खेळ,जन्म कोणी मागू नये
जिंकून घ्या विश्व सारे,जीवनरेषा कोणी खोडू नये
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये..............kharach khup sundar lines aahes ...apratim