आठवण..आपण ऐकू शकता...

Started by Sadhanaa, September 29, 2012, 01:22:04 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

.
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/09/blog-post_28.html

                   आठवण...

विसरणार न कधीं मी भेट पहिली दोघांची
एकाच त्या दृष्टीत  पेटली ज्योत प्रीतीची।
पाहुनी तुझे नेत्र हसरे मन माझे मोहवले
अन तुझ्या मिलनास्तव हृदय माझे ओढावले ।
पहिल्या वहिल्या त्या भेटी  ओठांवर न शब्द आले
निःशब्द नेत्रांनी परंतु  अंतरीचे भाव कथिले ।
घेतला पसारा वृक्षाचा  प्रीतीच्या नाजूक रोपट्याने
अन मिलन झाले अपुले देवादिकांच्या साक्षीने ।
मिसळूनी श्वासात श्वास धागे गुंफीत प्रेमाचे
संगे तुझ्या अनुभवितो  जीवन हे स्वर्ग सुखाचे ।
चिरंतर राहो प्रेम अपुले  हाच एक ध्यास मनी
आण प्रभूला हीच घालतो क्षणा क्षणाला प्रार्थुनी ।
निरंतर अपुल्या प्रेमासाठी आण घातली मी प्रभूला
अन निश्चीन्तीत मनाने संसार अपुला उभारला ।
परि माझ्या प्रीतीत त्याला एकतानता न दिसली
म्हणुनी माझ्या संसारावर कुऱ्हाड त्याने अशी मारिली ।
काय जाहला कसूर मलाच ते नाही उमगले   
त्या साठींच कां अवेळी  परमेश्वराने सखीस नेले ।
कष्टातही सुख मानुनी  प्रीत स्वप्ने रंगावली
परि एक दिन अचानक प्रीत माझी जळुनी गेली ।
राहिलो आतां एकटा मी  सखीच्या स्मृतित गुंगून
प्रभूच्या मनात असेल तेव्हां  तिला भेटण्या जाईन ।
आतां तिच्या आठवणींत  जीवन फक्त हे जगतोय
भुता सारखा एकला मी  जीवनांत हा वावरतोय ।।
                   
                  रविंद्र बेंन्द्रे


MK ADMIN

Krupaya adhi kavita post kara va tya khali tumchya links post kara.