गणराया ची कृपा

Started by Tushar Kher, October 01, 2012, 09:54:33 PM

Previous topic - Next topic

Tushar Kher

जेव्हा जसे सुचले, तेव्हा तसे लिहिले
गणरायाच्या कृपेने त्याचेच काव्य झाले

चार शब्द इकडून तिकडून गोळा करून मांडले
मोरया तुझी मेहेरबानी, ते लेख म्हणून खपले

चार वेड्यावाकड्या रेघा मी इकडे तिकडे काढल्या
कृपा गणपती तुझी, त्या ही चित्रात जमा जाहल्या

आवाजाची चढ़उतर व निव्वळ हातवारे
गणेशा कृपा तुझी, त्याचे ही नाट्य व्हावे

विचार न करता आज वर स्वछन्दपणे मी वागलो
सुखकर्ता तुझ्या कृपेने आजवर सुखी राहिलो

प्रार्थना तुझ्या चरणी एवढी, कृपाछ्त्र तुझे मज नेहेमी लाभावे
राहिलेले आयुष्य ही माझे, तू आनंद उत्साहात घालवावे


तुषार खेर

केदार मेहेंदळे


Tushar Kher