चूकभूल

Started by Mangesh Kocharekar, October 02, 2012, 10:23:39 AM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar

चूकभूल द्यावी घ्यावी असे आपण म्हणतो
खरच का आपण हिशेब करण्यास चुकतो
वाणी शाळेत न जाता हिशेब शिकतो
लोहार हत्यारासाठी अनुभवाने घाव घालतो
आपण मात्र शिकण्यासाठी विद्यापीठे खोलतो
परीक्षेच्या मोजपट्टीने बुद्धिमत्ता तोलतो
कधीमधी ताळतंत्र सोडूनही बोलतो
वयस्क माणसासमोर अकलेचे तारे तोडतो
दुसरयाला दुखवताना वाग्बाण सोडतो
कुणीतरी अडला पाहून अधिकाराने नाडतो
सांगा पाहू , खरच का आपण चुकून चुकतो ??

 
चूकभूल द्यावी घ्यावी असे सरावानेच म्हणतो
अनुभवासारखा गुरु नाही हेच लहानांना सांगतो
कटू अनुभव येताच मात्र समजून उमजून भांडतो
आपल्या सहकाऱ्याच रक्त उगाचच सांडतो
आपलंच खंर करण्यासाठी शब्दांनाच कांडतो
एरवी आपण गांधी बापुलाही मानतो
अहिंसेच तत्व लोकांनाही सांगतो
गरीबीतही गुण्यागोविंदाने नांदतो
पाळणा हल्ण्यासाठी दोन दोन वर्ष थांबतो
गर्भपात घडवताना दिवसांचा हिशेब मांडतो
सांगा पाहू , खरच का आपण चुकून चुकतो ?? 

                                                          मंगेश कोचरेकर

केदार मेहेंदळे

chukat nahi aapan
swarthi pana karto
saravani matr
chukbhul dyavi ghyavi mhanto

kavita awadali....