मित्र

Started by Tushar Kher, October 02, 2012, 08:01:45 PM

Previous topic - Next topic

Tushar Kher

जेव्हा त्याला नेटवर भेटते
माझ्या मनी उर्मी भरते ।
त्याने पाठवलेल्या "स्माइली"
माझ्या चहेरी  हसू आणते ।

त्याचे ते प्रेमळ बोलणे,
मधूनच विनोद करणे,
सांगायचे जे असते ते
सहजगत्या मांडणे,

मनाला माझ्या भिडून गेले,
त्याचे ते लाडिक वागणे।
कधी एकदा त्याला भेटते
अशी सारखी ईच्छा होते.


तुषार खेर

nishigandha

its realy niceeeeeeeeeeeee

Tushar Kher