तुझ्या सारखे कुणीच नाही...!!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, October 03, 2012, 11:06:40 AM

Previous topic - Next topic
तुझ्या  सारखे कुणीच नाही...!!

गर्दीत सोडणारे आहेत  इथे
पण ....??
त्यात हात पकडणारा  कुणीच नाही
हरवशील सांगत सोबत चल म्हणणारे  कुणीच नाही

हो खरच तू म्हणत  होती मी खूप साधा आहे
मला ओळखणारे कुणीच नाही
तू होतीस आहेस म्हणून मी जगतो आहे
आपले म्हणणारे इथे माझे कुणीच नव्हते

तुझ्या सारखे कुणीच नव्हते ..!!

रोज  दिवस येतो पण रात्र होताना
तुझी आठवण  जातच नाही
एवढे प्रेम  दिलास  मला
तुझ्यावीण सखे राहवतच  नाही

खरंच  शोना तुझ्या सारखे कुणीच नाही ... !!

तूच  म्हणत होतीस मी दुखी कविता का करतो
वाटत होतं माझ्या जगण्याला काही कारणच  नाही
तू भेटलीस अन कळले
तुझ्याविना  हे जगणे जगणेच नाही ...

शोना तुझ्यासारखे कुणीच नाही
असेच जवळ  घे
मला दूर  कधीच  जायचे  नाही ....

शोना तुझ्या सारखे कुणीच नाही ....!!
-
© प्रशांत शिंदे



कवि - विजय सुर्यवंशी.

तूच  म्हणत होतीस मी दुखी कविता का करतो
वाटत होतं माझ्या जगण्याला काही कारणच  नाही
तू भेटलीस अन कळले
तुझ्याविना  हे जगणे जगणेच नाही ...

शोना तुझ्यासारखे कुणीच नाही
असेच जवळ  घे
मला दूर  कधीच  जायचे  नाही ....

शोना तुझ्या सारखे कुणीच नाही ....!!


atishay surekh ... manala sparsh karun janari kavyarachana....



तूच  म्हणत होतीस मी दुखी कविता का करतो
वाटत होतं माझ्या जगण्याला काही कारणच  नाही
तू भेटलीस अन कळले
तुझ्याविना  हे जगणे जगणेच नाही ...

शोना तुझ्यासारखे कुणीच नाही
असेच जवळ  घे
मला दूर  कधीच  जायचे  नाही ....

शोना तुझ्या सारखे कुणीच नाही ....!!


atishay surekh ... manala sparsh karun janari kavyarachana....


dhanyvad  vijay ji