पाऊस परतीचा...

Started by Sameer Nikam, October 03, 2012, 03:46:35 PM

Previous topic - Next topic

Sameer Nikam

होऊनिय अचानक प्रकट 
जाता जाता पाऊस परतीचा
मांडुनीया थैमान सर्वत्र
सांगे  विश्वकर्मा मी या धरतीचा

कड कडात गर्जना करीत
दाखवे अदभूत दृश्य विजा सहित
जणू सांगती काही इशारयात
येईन पुढल्या खेपेस जोमात

येती घेवून उरात वादळ
जणू करती शक्तीचे प्रदर्शन
उगाच करुनी सगळयांची धावपळ
देती संदेश येईन मी परतून

जाता जाता पेश करती
सुखद अनुभव  गोड  गारव्याचा
जणू आठवण करुनी  देती
येणाऱ्या गुलाबी थंडीचा

आता भागवली त्याने तहान
उरले सुरले साऱ्यांची
गेला तो निरोप घेवून
पाहू वाट पुढल्या वर्षी त्याच्या येण्याची  


समीर स निकम