शांत वरुनि दिसतो मी …

Started by Sadhanaa, October 03, 2012, 11:11:44 PM

Previous topic - Next topic

Sadhanaa


शांत वरुनि दिसतो मी
परि आग भडकली हृदयांत 
प्रज्वलित होईना म्हणूनि
राहिली आहे धुमसत  ।
धुमसणाऱ्या अग्नीमुळे
हृदयांत कोंडून येते
मुखावरील हास्य परि
फक्त जगाला दिसते  ।
खेळ हा विदुषकाचा
जीवनांत खेळतो आहे
मनीच्या व्यथा दाबून
आभास निर्मितो आहे  ।
मनांस परि एकच आंस
सदा लागून राहिली आहे
विदुषकाचा बुरखा कधीं
फाडून दूर करणार आहे  ।
कठपुतलीचा खेळ परि
दैव खेळवीत रहाणार आहे
दोरी त्याची तुटेल तेव्हां
त्यातून सुटका होणार आहे  ।
तोंवर तरी त्याची वाट
मज पहावी लागणार आहे
आंतल्या आंत जळुन सुद्धां
जगीं हंसावे लागणार आहे  ।
रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this

http://ravindrabendre.blogspot.com/2012/10/blog-post_3.html