ये परतुनी सख्या

Started by SANJAY M NIKUMBH, October 05, 2012, 08:16:27 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

ये परतुनी सख्या

फुल कोमेजून जावं
तसं आयुष्य झालंय
तू नाहीस जवळ
मनी वैराग्य आलंय
सुखाचे सारे क्षण
कुठे हरवून गेलेय 
बहरलेले रान सारे
उजाड होऊन गेलेय
आनंदाचे तळे होते
मन माझे केवढे
उरले वाळवंट आता
हाती माझ्या तेवढे
कोठे हरवून गेले
ते ऊन कोवळे
प्रत्येक क्षण होते
जणू नवे सोहळे
तू होतास तेव्हा
मनी होता वसंत
भारलेल्या हृदयात माझ्या
होता तुझा प्रीतगंध
ये परतुनी सख्या
नको पाहूस अंत
ओंजळीत टाक माझ्या
पुन्हा तू वसंत .

                                     संजय एम निकुंभ , वसई
                                    दि. ५.१०.१२ वेळ : ७.४५ रा.