मना

Started by Tushar Kher, October 05, 2012, 09:45:49 PM

Previous topic - Next topic

Tushar Kher

इकडे तिकडे भटकंती बंद कर मना,
मला तुझा खरा पत्ता सांग मना.

एका ही सुखात तुला समाधान  नाही, मना
रोज का नवीन दुखे मज देतोस, मना?

थोड्या वेळ तरी विश्रांती मज घेवू दे, मना,
नवनवीन गोष्टीत मज गुंतवू नकोस, रे  मना

कधी संसारी आणि कधी सन्यासी बनून
ठोल्की   सम दोन्ही कडून बडवू नकोस, मना.


तुषार खेर

केदार मेहेंदळे


Tushar Kher