आठवणींच्या राज्यांत...

Started by Sadhanaa, October 05, 2012, 10:13:50 PM

Previous topic - Next topic

Sadhanaa


आठवणींच्या राज्यांत
                   गुंगून तूं राहू नको
व्यवहार अन् दुर्लक्षून
               दिवा स्वप्नें पाहू नको ।
जीवनी संधी एकच येते
त्याचवेळी दैव खेळते
अन् तिज गमावून बसते
गेलेल्या त्या क्षणांसाठी
             हळहळ नंतर करू नको। 
जेव्हां तारुण्यात असतो
उन्माद मनावरती चढतो
विवेक सारा विसरुनि जातो
अश्या फसव्या त्या क्षणाला
              आभासांत तूं राहू नको ।
जीवन आहे जगण्यासाठीं
कर्तव्य आपुले करण्यासाठीं
नाहीं फक्त स्वसुखासाठीं
ह्या सूत्राचा जीवनांत तूं
                विसर पडू देऊ नको ।।
रविंद्र बेंद्रे

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/10/blog-post_5.html