मी माणूस धर्माचा

Started by SANJAY M NIKUMBH, October 06, 2012, 07:16:57 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

मी माणूस धर्माचा

चेहरा पाहिल्यावर कुठल्या धर्माचा
ते नाही समजतं
विचारल्याशिवाय जात न धर्म
कुणासही नाही कळत
म्हणजे देह माणसाचा
एकच तर असतो
फक्त ओळख व्हावी म्हणून
चेहरा बदललेला असतो
जगतांना खंर तर
जात न धर्माची गरजच नसते
ते बघून कां कुणी
मदतीस धावत असते
मग कशाला एवढं अवडंबर
माजवलं जात धर्मांच
त्यामुळेच नुकसान होत
माणसातल्या माणुसकीच
कुणी मेला अपघातात
तरी तो आपला कां लोक विचारतात
नसेल आपला तर सुस्कारा सोडून
काही न घडल्यासारख निघून जातात
तेव्हा माणुसकीच मरणं
उघड्या डोळ्यांनी मी पाहतो
कां केले हे धर्म निर्माण
याचाच विचार करत राहतो .

                                                   संजय एम निकुंभ , वसई
                                                 दि. ६.१०.१२ , वेळ : ९.५०
 

Tushar Kher

माणुसकी चे मरण आपल्यला बरेच  ठिकाणी पाहायला मिळते.
म्हणूनच मी म्हणतो
माणसाच्या गर्दीत मी मानुष शोदाह्त आहे
माणुसकी जपणारा खरा माणूस शोधात आहे