तुला खुप प्रेम करायचे आहे गं मला..

Started by प्रशांत दादाराव शिंदे, October 07, 2012, 02:33:34 AM

Previous topic - Next topic
शोना तुझ्या  हातात हात माझा
नेहमीच असावा वाटतं
जेव्हा तु म्हणतेस
प्रेम करशील ना रे मला..

शोना तुझ्याकडेच पहावं वाटतं
जेव्हा म्हणतेस
आकाशा एवढं प्रेम देईन मी तुला
कसलाच विचार न करता
कसे गं बोलतेस मला
तुला मिठीत घेऊन जगावं वाटतं मला

आयुष्य खुप कमी आहे गं माझे
तुझ्यासमोरच मरण यावं वाटतं मला..

म्हणतेस सारखी नको ना असे बोलत जाऊ
खरंच खुप प्रेम करते रे तुला
डोळयांतल्या पाण्याने भिजवावं वाटतं गं तुला

तु रडत नको जाऊ शोना
नेहमीच हसावं तु
हीच छोटी ईच्छा आहे बघ मला...

तुला खुप प्रेम करायचे आहे गं मला..
-
© प्रशांत शिंदे

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*"˜˜"*°•.
` `... ¸.•°*"˜˜"*°•.
...`© प्रशांत शिंदे