आपलंही कुणी असावं

Started by Sameer Nikam, October 07, 2012, 09:46:06 PM

Previous topic - Next topic

Sameer Nikam

हातात हात धरून निशब्द चौपाटीवर फिरणारं
मधेच क्षणभर थांबून प्रेमाने मिठीत घेणारं
कधीतरी वाटत  आपलंही कुणी असावं

न चुकता भेटावया नेमाने रोज  येणारं
जाताना डोळ्यात मोती अश्रुचे आणणारं
कधीतरी वाटत  आपलंही कुणी असावं

माझ्या हि आठवणीत कुणीतरी रात्रभर जागणारं
तिच्या चंदेरी स्वप्नांच्या दुनियेतून मलाही बाहेर न पडू देणारं
कधीतरी वाटत  आपलंही कुणी असावं

स्वःताचे सुखं विसरून आपल्या दुखात साथ देणारं
माझ्या खचलेल्या मनाला पुन्हा नव्याने जगण्याला आधार देणारं
कधीतरी वाटत  आपलंही कुणी असावं

माझ्या खांद्यावर डोके ठेवून तिला रडावस वाटावं
लहान मोठ्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव
कधीतरी वाटत  आपलंही कुणी असावं

कुणीतरी माझ्याही प्रेमात आकंठ बुडाव
येवूनिया माझ्या कुशीत सार जग विसरावं
कधीतरी वाटत  आपलंही कुणी असावं

कुणीतरी माझ्यासाठी  तासनतास वाट बघावं
येताना मला पाहून उगाच  फुगवून बसावं
कधीतरी वाटत  आपलंही कुणी असावं

रात्रभर फोनवर्ती रोम्यांटिक गप्पा मारणारं
माझा ब्यालेन्स संपला म्हणून तू फोन कर सांगणारं
कधीतरी वाटत  आपलंही कुणी असावं

समीर स निकम



Sameer Nikam




Sameer Nikam