आता पुन्हा एकदा दवबिंदु,आठवणीत ती जमवू लागली

Started by Mandar Bapat, October 08, 2012, 12:39:20 PM

Previous topic - Next topic

Mandar Bapat

पुढे जाऊन ती परत आली
मन वेड्याला पालवी आली
आता पुन्हा एकदा दवबिंदु 
आठवणीत ती जमवू लागली   

विस्कटलेले नाते अमुचे
समजण्याचा ते असे पलीकडचे
आठवणीच्या तीक्ष्ण दाभणाने
टाके  देत ती शिवू  लागली 

आता पुन्हा एकदा दवबिंदु 
आठवणीत ती जमवू लागली

आठवणीच्या ठिगळांची चादर अमुची
पांघरली या विश्वासी संसाराची
होतो तोच मी अन तीच ती
स्वप्ने नवे गुंफू लागली

आता पुन्हा एकदा दवबिंदु 
आठवणीत ती जमवू लागली

ओठात ओठ रमली अमुची
विसर पडली अवघ्या विश्वाची
मी नव्हतो माझात अन मिठीत ती
हर्षात ती भिजू लागली 

आता पुन्हा एकदा दवबिंदु 
आठवणीत ती जमवू लागली

प्रेम जुने नवी भेट अमुची
भेट जणू ती नव्या जन्माची
माझा मी नाही अन तिची ती
माझात ती हरवू लागली 

आता पुन्हा एकदा दवबिंदु 
आठवणीत ती जमवू लागली

                                    ---मंदार बापट