स्त्री ही एक ज्योत आहे..

Started by Sadhanaa, October 09, 2012, 01:17:36 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa


ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/10/blog-post_8.html
स्त्री ही एक ज्योत आहे...
कोणी कोणी म्हणतात  स्त्री ही एक ज्योत आहे
तर कोणी सांगतात   ती मधूर गंध आहे ।
तिला ज्योती प्रमाणे   उज्ज्वल प्रकाश आहे
भस्मात करण्याच  तिच्या मध्ये ताकत आहे ।
अनेक रंग अनेक गंध   मोह्कताही विपुल आहे
मानवाच्या बुद्धीला  ती एक आव्हान आहे ।
कोणी कोणी म्हणतात स्त्री अथांग सागर आहे
तर कुणी म्हणतात  ती निळे अंबर आहे ।
तिच्यापाशी मंद लाटांवर  खेळवण्याची युक्ती आहे
भयानक खवळून विध्दंसनाची शक्ती आहे ।
आभाळांत फिरणाऱ्या  चंद्राची शीतलता आहे
तापलेल्या सूर्याची  तिच्यात प्रखरता आहे ।
अनेक वेळा म्हणून वाटते  स्त्री ही अतर्क्य आहे 
ब्रम्हदेवाला पडलेले  एकच कोडे आहे  ।
मला वाटते स्त्री ही  जादूची पोतडी आहे 
कुणी सांगू शकत नाहीं  तिच्यात काय भरले आहे ।
क्षणा क्षणाला नराची  उत्सुकता वाढवित आहे 
राग अनुरागाच्या तालावर  त्याला सदा नाचवत आहे ।
तिचे मधुर रौद्र रूप   पुरुषाला ते ठाऊक आहे 
तरी तो एक सारखा तिच्यासाठीं मरत आहे ।
त्याच्या ह्या तळमळींत जुगारी वृत्ती आहे 
हरून सुद्धा मनीं त्याच्या जिंकण्याची आशा आहे ।
आजवर पुरुष सदा ह्या जुगारात हरला आहे
कारण स्त्री, स्त्री आहे  जादूची पोतडी आहे  । ।
       रविंद्र बेन्द्रे