आठवतं का तुला आपली पहिली भेट .... !!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, October 09, 2012, 05:50:55 PM

Previous topic - Next topic
फेसबुक वरील एक सत्य प्रेम कहाणी जी काहींसोबत झालेली असेलच .. 

आठवत का तुला आपली भेट ..!!

तूझी आणि माझी ओळख online झाली होती
तू नसायची जास्त पण मी  वाट पाहायचो
तू यायची अन मी तुला छेडायचो
तू थोडी रागवायचीस पण पुन्हा तू बोलायचीस
रागावलास का रे माझ्यावर  म्हणत  बोलना म्हणायची
थोड्याच दिवसात आपण जवळ आलेलो
कधी कधी येणारी तु आता खूप वेळ थांबायला लागली
सगळ्यांशी बोलणारी तू आता फक्त माझ्याशीच बोलू लागली

आठवतं का तुला  आपली पहिली भेट .... !!

आपण मित्रांसोबत भेटलेलो तू काहीशी लाजलेली
अन मी हि  तसा घाबरलेलो तू रागावशील तर नाहीस 
म्हणून मी गप्प्प राहिलेलो
तसे दोघे हि खूप खुश होतो 
अन तेव्हाच दोघंही प्रेमात आहोत हे कळलेलं ....
मग तू थोडा  वेळ माझ्याशी फोनवरहि  बोलू लागली
घरच्यांसमोर घाबरतेस म्हणून बाल्कनीत येऊन बोलू लागली ....
मग  तुला भेटायला   मी हि  कारण शोधू लागलो
सुरवातीला नाही पण मग मात्र तूच यायला लागलीस ....

तुला अन मला ओढ लागली होती
लग्न करण्याची  स्वप्न  आपण पाहू लागलो
तुझे  घरचे  नाही बोलतील म्हणून तू घाबरली होती
मी किती प्रेम करतो  हे तू हि जाणत होती
म्हणूनच तर घरच्यांना हि हिम्मत करून
तू आपल्याबद्दल बोलत होती .....

पण लग्न होणार नाही हे तुलाच  माहित होतं
कारण माझ्या प्रेमापेक्षा तुला  तुझा  रक्त होतं
मी आज हि  एकटाच आहे  तुझी वाट पाहत

आठवत  का तुला माझा  चेहरा 
तो चेहरा आज उदास असतो
तूला आठवत  नेहमीच  ओला होत असतो ..
कधी  कधी तर नशेत हि बडबडत असतो
खूप प्रेम केले  म्हणूनच तर सारखे  तुलाच आठवत असतो ...

आठवतं का तुला आपली पहिली  भेट  ....??

-

© प्रशांत शिंदे

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*"˜˜"*°•.
` `... ¸.•°*"˜˜"*°•.
...`© प्रशांत शिंदे

Akash Namdev Ghode



Mast rao!!!!!
manapasun avdli kavita.
thanx for wonderful experience :P
dhanyvad akash :)