मूर्तिमंत शौर्य

Started by kumudini, October 10, 2012, 04:58:27 PM

Previous topic - Next topic

kumudini

मूर्तिमंत शौर्य - झाशीची राणी

कुमुदिनी

झाशीची राणी देवा

घाल तू पुन्हा जन्माला



उतरली रणी मैदाना

कापण्या शत्रूच्या माना

घालती बोट तोंडात

पाहूनी शत्रू शौर्याला ||

क्षण एकही ना डगमगली

जरी बलाढ्य शत्रू सेना

फितुरांनी किल्ला होता

आधीच जरी पोखरला ||

मारुनी टाच घोड्याला

घेउनी शीर तळव्याला

शत्रूच्या भिडली अंगाला

घालण्या कंठ स्नानाला ||

आखरी बुंद रक्ताचा

झुन्झला देश रक्षाया

घेतला श्वास अंतीचा

अर्पुनी शीर कमलाला ||




rudra