हे प्रेमच तर आहे नां !

Started by SANJAY M NIKUMBH, October 10, 2012, 10:54:51 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

हे प्रेमच तर आहे नां !

तू माझी झाली नाहीस
म्हणून हे जग
मला वेड्यात काढतं
माझं होणं म्हणजे काय 
माझं निरागस मन
त्यांना विचारत रहातं
प्रेमात मिलनच झालं नाही
तर काय अर्थ त्या प्रेमाचा
फुकट गेले सारे क्षण
काय अर्थ त्या भावनांचा
मग मी म्हणतो जगास
तुम्हास काय कळतं प्रेमाच
प्रेम हे भावनांनी होत
तेथे कामच काय शरीराच
तुम्हीही केलं असेल प्रेम
खेळलाही असाल शरीराशी
पण त्या आठवणी कुणी
घेवून फिरतो कां हृदयापाशी
जे क्षणभंगूर आहे
त्यात मला कधीच रस नव्हता
मला फक्त माझ्या प्रेमाच्या
आत्म्याचा स्पर्श हवा होता
धरती न आभाळ
सागर न किनारा
याचं मिलन कधी होणार कां ?
म्हणून त्यांच्या प्रेमाला काय अर्थ
असं म्हणता येत कां ?
तुझं  मन , भावना , आत्मा
मी माझ्या प्रेमानं जिंकल
तुझ्या मिलनासाठी मी कायम झुरेलं
हे सुख काय कमी नाही का ?
शरीरापलीकडेही प्रेम असतं
हे या जगास कधी कळेल कां ?
जे प्रेम मला गवसलंय
ते प्रेम यांच्या नजरेस तरी पडेल कां ?
प्रत्येक क्षण बेधुंद होऊन जगणं
सावलीसारख तिचं माझ्यासोबत असणं
सुख असो व दुखः तिचा आधार वाटणं
मनापासून तिचा माझ्यावर विश्वास असणं
हे प्रेमच तर आहे नां
मीच कुठलीही आस ठेवली नाही प्रेमाकडून
असंही प्रेम असतं हे दाखवलं माझ्या प्रेमातून .

                                                          संजय एम निकुंभ , वसई
                                                       दि. ०७ १०.१२ . वेळ : ८.१५ स.
                                                        { मिरारोड बसमध्ये }


jyoti salunkhe