माझ्यासाठी

Started by spandan123, October 11, 2012, 04:04:54 PM

Previous topic - Next topic

spandan123

 
माझ्यासाठी
प्राणाहून प्रिय तू
शब्दान पलीकडली  आहेस  तू
संगीताची  धून  तू
गाण्यातले  सूर  तू
कवितेतले  शब्द  तू
माझ्यावर  रुसणारी  पण  तरी  माझीच  आहेस  तू

उश्माघातातली  गार  वार्याची लहर  तू
पहिल्या  पावसाची  पहिली  सर  तू
इंद्रधनुष्याच्या सप्तरंगातील  रंग  तू
श्रावणातल्या  धुंद  मनाची  पहिली  पालवी  आहेस तू
माझ्यावर  रुसणारी   पण  तरी  माझीच  आहेस  तू

माझ्या  श्वासातला  हुंकार  तू
तापलेल्या  भावनांची  फुंकर  तू
तोल  गेलेल्या  मनाचा  आधार  तू
हृदयाच्या  स्पंदनाचा  आभास  तू
माझ्यावर  रुसणारी  पण  तरी  माझीच  आहेस  तू

Sandeep gojare