द्वैत अद्वैत

Started by kumudini, October 11, 2012, 05:11:09 PM

Previous topic - Next topic

kumudini

द्वैत अद्वैत

कुमुदिनी

नको वाजवू बासरी, सख्या हरी

होई राधा कावरी बावरी

सूर मुरली चे कानी येता

सैर भैर मी तुला शोधीता

दिसल्या विण तू उदास मन हे

नसते थाऱ्या वरी ||१||

ओढ अशी ही जगावेगळी

द्वेईता मधुनी  अद्वेईताची

जनरीती चे बंधन तोडी

प्रीत अशी न्यारी ||२||