जाता जाता आले कळून मला....

Started by Sameer Nikam, October 12, 2012, 02:18:23 PM

Previous topic - Next topic

Sameer Nikam

जाता जाता आले कळून मला
माझा अहंकार मलाच जाळत होता
दुसरयाला कमी लेखून स्वतःला मोठा भासवत होता

जाता जाता आले कळून मला
अखंड आयुष्य धन दौलत गोळा करीत होतो 
पण नाही कळले कधी त्यामुळे नाती गोती गमवत होतो

जाता जाता आले कळून मला
नाही कधी केली, कोणाच्या इच्छा आकांक्षाची, परवा मी
दिवस भर बुडून राहिलो,बेदुंध दारूच्या नशेत मी

जाता जाता आले कळून मला
इतरांना  यशाची पायरी चढताना पाहून मनात जळत होतो
स्वतः मात्र कर्म करण्याएवजी नशिबाला दोष देत बसलो होतो

जाता जाता आले कळून मला
ज्यांनी मला बोट धरुनी चालायला शिकवले
तोच हाथ धरुनी, आई बाबांना घरा बाहेर हाकलले

जाता जाता आले कळून मला
नाही कधी दिला, म्हाताऱ्या आई बाबांना, काठी बनुनी आधार
मीच आहे त्यांच्या , वाईट अवस्थेचा गुन्हेगार

जाता जाता आले कळून मला
दुखावलेल्या साऱ्यांचीच माफी मागायची आता  आहे मला
इतके वाईट कर्म केले आहेत कि,दुसरे जन्म देखील कमी पडेल त्याला

जाता जाता आले कळून मला
गर्वापायी आयुष्यभर आपल्या लोकांना, आपल्या पासून दूर लोटले
ते मात्र माझ्या शेवटच्या हाकेला सारे विसरुनी  पहिले धावून आले

जाता जाता आले कळून मला
श्री कृष्णाने देखील, सांगितले हा कलयुग आहे
इथेच कर्म करुनी इथेच पाप फेडणे आहे   


समीर सु निकम

 

केदार मेहेंदळे



विक्रांत

sameer,
जाता जाता आले कळून मला ,
नेमके कुठे जाता हे कळत नाही मला.

Sameer Nikam

@Vikrant
जाता जाता देवाकडे आले कळून मला....

मरता मरता आले कळून मला
असे बरे नाही वाटत म्हणून जाता जाता आले कळून मला हि लाईन वापरली
पण कविता कशी वाटली

विक्रांत