कॉलेजचा पहिला दिवस

Started by Sameer Nikam, October 12, 2012, 07:01:42 PM

Previous topic - Next topic

Sameer Nikam


गंमतीदार दिवस पहिला होता तो कॉलेजचा
आयुष्याभरासाठी  आठवणीच्या ओंजळीत भरण्याचा

नटून थटून हेंड फोन कानात घालून निघालो कॉलेजला
कॉलेज जवळ दिसताच पाय लागले होते लटपटायला

आठवतोय अजूनही पहिला तो दिवस माझा कॉलेजचा
होती साथ माझ्याप्रमाणे घाबरत पाय वर्गात टाकनाऱ्यांचा

पहिल्या बाकावर बसण्याची वाटत होती मनाला भीती
पहिल्याच दिवशी अब्रू नं जाऊ देण्याची  होती ती युक्ती

ना पहिल्या ना शेवटच्या बसलो मी मधल्या बाकावर
जणू मिळाले दुसरे जीवन युद्धाच्या रणांगणावर

लपून छपून कान्या कोपऱ्यातून माझी नझर होती फिरत
कोणती सुंदरी कोणत्या बाकावर ह्याचा हिशोब जोडत

नाही पाहिल्या अश्या  सुंदर परी मी आजवर
केला दृढ निच्छेय मनाशी  पटवीन एकतर

सारे होते मग्न एकाउंटस चे नियम समजण्यात
मी मात्र भटके घेवूनीया म्याडमला माझ्या चंदेरी दुनियात

बघता बघता तास संपला नवीन तास सुरु झाला
सारे काही वरून गेले म्हणून बाजूचा मान खाली घालून शांत निजला

घाई गडबडीने वाट शोधत जाई कॅन्टीनला
मोठ्या रुबाबाने घेई चहा दोन रुपयाला

सिनिअर्सला येताना पाहून शोधे सारे पळवाटा
जो जो त्यांच्या हाती लागला
झाला त्यांचा नावांचा  सर्वत्र गोंगाटा

हळूहळू दिवस मावळला शेवटचा तास हि संपला
सारेच दमलेले ओवरडोस ने
निघाले नव्या मित्रांच्या सोबतीने घरला

कविता आवडल्यास नआवडल्यास प्रतिक्रिया द्याव्या
समीर सु निकम

केदार मेहेंदळे