विभक्त

Started by प्रसाद पासे, October 12, 2012, 07:16:33 PM

Previous topic - Next topic

प्रसाद पासे

विभक्त

आताशा मीही झालो आहे निर्वातासारखा रिक्त
ज्याक्षणी झालीस तू माझ्यापासून विभक्त

मांडलीस तू तुझीच बाजू फक्त
माझं मन अजूनही आहे तसंच अव्यक्त
का इतकं होतं आपलं प्रेम अशक्त?
आताशा मी झालो आहे निर्वातासारखा रिक्त

नाही म्हणून गेलीस तू खूप दूर
इतकी अलगद लावून गेलीस मनाला हुरहूर
अगदी सहजच झालीस तू सर्व बंधनातून मुक्त
आताशा मी झालो आहे निर्वातासारखा रिक्त

म्हणालीस तू मला, झाली आहेस तू आतुन दगड
पण कधीच जाणली नाहीस का माझी भावनांची मुकी ओरड
का आहेस तू तुझ्या भावनांशी एवढी आसक्त?
आताशा मी झालो आहे निर्वातासारखा रिक्त

झाल्या असतील चुका पण त्याची हि कुठली सजा
सगळंच सोडून, घेतलीस तू कायमची रजा
का झालीस तू सगळ्यांपासून अलिप्त?
आताशा मी झालो आहे निर्वातासारखा रिक्त

सावरतोय स्वतःला मोजत स्वतःच्या चुका
घालवतोय आयुष्य मांडून स्वतःच्याच व्यथा
अन करतोय स्वतःला दिवसेंदिवस सक्त
कारण मी झालो आहे निर्वातासारखा रिक्त

प्रसाद पासे

Tushar Kher


Preetiii

Awesome ahe kavita..khupach chhan

केदार मेहेंदळे