भावना वेड्या मनाच्या..!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, October 13, 2012, 06:04:15 PM

Previous topic - Next topic
पहील्या भेटीत एका प्रेमवेडयाने व्यक्त केलेल्या भावना..
काल ठरवलं मी तिला भेटायचं

ती ही आतुर होती भेटावयास

तिची लगबग मज भेटण्यासाठी होती

तिने ही घरी बहाना केला होता

स्पंदने तिची मला ती ऐकवत होती

ती म्हणाली पाहतोस का तु कधी

भिजलेल्या हया डोळयांना
आतुर असतात त्या रोज मला जागवण्यासाठी

मी जागते तुझी वाट पाहत
पण..??
केव्हा डोळे बंद होतात कळत नाही

वाटतं तु वाटच पाहत असतोस
मी निघते कधी चांदण्यात तुला शोधण्याची

जे तु एक मोती सारखा चमकतोस तुझ्या जवळ येताच
तु अंधारात सोडुन जातोस...

मी ही दाखवलं तिला
भावस्पर्श माझ्या डोळयांतलान

मी ही प्रेम करतो हे तुला कसे मी जाणवणार

वारयाच्या त्या लहरीमध्ये ही तुझाच सुगंध
माझ्या वेडया मनाला मुग्ध करत असतो

नको बोलु ऐसे मी किती तुला आठवण करतो

ते सोनेरी पान बघ तुला आठवण्याआधी ते पुरेपुर कोर असतं...

होशील ना माझी शोना..
कळलंय मला हे जिवन प्रेमाशिवाय अधुरं असतं..
-
© प्रशांत शिंदे
१३/१०/१२