आम्ही फकीर फाटलेले

Started by SANJAY M NIKUMBH, October 13, 2012, 10:14:59 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

आम्ही फकीर फाटलेले

आम्ही फकीर फाटलेले
शब्दात रमणारे
शब्दच असती अमुचे
सगे सोयरे
शब्दांच्या झुल्यावर
आम्ही झुलणारे
स्वप्नातही शब्दांशी
आम्ही खेळणारे 
मनातल्या भावनांना
कागदावर उमटवणारे
हरवलेल्या संवेदनांना
आम्ही जागवणारे
भिती ना कुणाची
तमा न बाळगणारे
शब्दांच्या तलवारीने
आम्ही लढणारे
कधी शब्दास वाकवणारे
कधी शब्दासाठी झुरणारे
रात्र रात्र सारी
शब्दासाठी जागणारे
खडकाळ जमिनीतही
हिरवळ पाहणारे
अंधारलेल्या रात्रीसही
पौर्णिमेचा चंद्र देणारे
पाऊस नसतांनाही
चिंब भिजणारे
मध्यान्हीच्या उन्हातही
चांदण्यात हरवणारे
सूर्यही पाहत नाही
ते आम्ही पाहणारे
आम्ही कवी सारे
बेधुंद जगणारे .

                              संजय एम निकुंभ , वसई
                              दि. १२.७.१२ स. ८.१५
                                   { मिरारोड बस }

rudra

mitra kavita chaan lihili aahes.... ;D miraroad bus.....

केदार मेहेंदळे