चार क्षण फक्त...

Started by Sadhanaa, October 15, 2012, 04:27:38 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

चार क्षण फक्त...
चार क्षण फक्त हा उज्ज्वल दिवा प्रकाशला
अन आतां जीवनभर अंधार तसाच राहिला
तरी काही फरक पडणार नाहीं ।
क्षणभर आज मला तूं म्हंटलेस आपले
सार्या जगाने आतां सदा मला झिडकारले
तरी काहीं फरक पडणार नाहीं ।
हसत खेळत मजसंगे टाकलीस दोन पावले
अन आतां सारे जीवन माझे विरहांत गेले
तरी काहीं फरक पडणार नाहीं ।
सहवासाचे चार मधूर क्षण मिळून गेले
अन आतां जीवनांत फक्त स्वप्नंच राहिले
तरी काहीं फरक पडणार नाहीं ।।
रविंद्र बेन्द्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
http://ravindrabendre.blogspot.com/2012/10/blog-post_14.html