चाक

Started by sudhanwa, October 15, 2012, 01:22:26 PM

Previous topic - Next topic

sudhanwa

जीवनचक्र आणि वास्तवातले चाक...ह्यांच्यातला मेळ...

चाक
जन्माला आलो होतो जेव्हा
कुंभाराच्या चाकावरचा गोळा होतो तेव्हा

शाळेची वाट धरली जेव्हा
मोपेडची स्टेप्नी आधार झाली तेव्हा

पाचवीत शिकत् होतो जेव्हा
सायकलीच्या चाकावर भिरभिरत होतो तेव्हा

काॅलेजकुमार झालो होतो जेव्हा
लुनाच्या चाकांवरुन तारुण्य न्याहळत होतो तेव्हा

पदवी करत होतो जेव्हा
मोटारसायकलच्या चाकांनी दरीखोरं धुंडाळली तेव्हा

पदव्युत्तर शिक्षण घेत होतो जेव्हा
पल्सरच्या चाकांवर जीवनसाथी भेटली तेव्हा

नोकरीत रुजू झालो जेव्हा
चाकं गुंडाळून हवेत उड्डाण घेतलं तेव्हा

संसारात पडलो होतो जेव्हा
चार चाकांवरून जीवन बघत होतो तेव्हा

कुटुंबवत्सल झालो जेव्हा
चाकांना रुळांची शिस्त आली तेव्हा

म्हातारपण आलं होतं जेव्हा
खुर्चीची चाकं; पाय बनले तेव्हा

कैलासवासी झालो जेव्हा
रथाच्या चाकांवर यात्रा निघाली होती तेव्हा....

http://csudhanwa.wordpress.com/2012/10/10/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95/

rudra

kavitecha aashay khup chaan aahe,
tyanchi jod ajun majbut havi hoti ..... :)

sudhanwa

Thank you Rudra...
I will try to refine it... :)